ज्योतिषशास्त्रानुसार, मानवी आयुष्यात राशीभविष्य , अंकशास्त्र, वास्तूशास्त्र, रत्नशास्त्र या सर्वांना प्रचंड महत्व आहे. या सर्व शास्त्रांच्या आधारे मनुष्याच्या आयुष्यात असणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात. शिवाय आर्थिक, वैवाहिक आणि सामाजिक प्रगतीसुद्धा होते. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट मानवी आयुष्यावर प्रचंड प्रभाव टाकते. आणि ती गोष्ट म्हणजे फेंगशुई शास्त्र होय. वास्तविक फेंगशुई हे एक चिनी वास्तू शास्त्र आहे. परंतु देशभरात या शास्त्राचा सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या जगात अनेक लोक फेंगशुईचा आधार घेतात.
फेंगशुई या वास्तू शास्त्रातसुद्धा आर्थिक समस्या, आर्थिक हानी, करिअरमध्ये अडचणी, घरातील सुखसमृद्धीत बाधा या सर्व अडचणींवर उपाय सांगण्यात आले आहेत. प्रामुख्याने फेंगशुई या वास्तू शास्त्रात घरामध्ये काही वस्तू ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. शास्त्राच्या मते या वस्तू तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. घरामध्ये सुख-समृद्धी उत्साह निर्माण करतात. शिवाय यांच्या योग्य वापराने घरात धनसुद्धा आकर्षित होते. त्यामुळेच जगभरात आज फेंगशुई वास्तूशास्त्र इतके प्रचलित झाले आहेत. या शास्त्रात अशा ५ वस्तू घरात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्याद्वारे पैसा चुंबकासारखा तुमच्या घरात आकर्षित होईल. आणि आर्थिक चणचण दूर होईल.
फेंगशुई वास्तू शास्त्रात कासवाला सुखसमृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच घरात कासव ठेवण्याचा सल्ला या शास्त्रात दिला जातो. हे कासव घरात ठेवल्याने धन तर येतेच शिवाय सुखशांतीसुद्धा लाभते. घरात दक्षिण किंवा पूर्व दिशेला हे कासव ठेवणे फलदायी असते. महत्वाचे म्हणजे या कासवाचे घर आतील बाजूस घराच्या दिशेला असावे.
जगभरात अनेक ठिकाणी आपल्याला बुद्ध मूर्ती दिसून येतात. त्यासुद्धा फेंगशुई शास्त्रातीलच एक महत्वाचा भाग आहे. बुद्ध हे समृद्धीचे प्रतीक समजले जातात. घरातील उत्तर-पश्चिम दिशेला बुद्ध स्थापित केल्याने घरात भरभराटी येते.
फेंगशुई शास्त्रातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मनी प्लांट होय. सध्या सर्रास सर्वांच्या घरात आपल्याला मनी प्लांट दिसून येते. या शास्त्रानुसार मनी प्लांट तुमच्या घरात धन आकर्षित करते. शिवाय नकारात्मक ऊर्जा दूर करते. हे रोप घरातील दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. शिवाय याला नियमित पाणी दिल्याने घरात सुखसमृद्धी नांदते.
बांबूचे झाड घरात ठेवणे अत्यंत शुभ समजले जाते. बांबूच्या झाड घरात ठेवण्याने कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते शिवाय उत्तम आरोग्य लाभते. बांबू घरातील पूर्व दिशेला ठेवणे उत्तम असते.
फेंगशुई या चिनी वास्तू शास्त्रानुसार घोड्याचे चित्र हे धनसंपदेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात हे चित्र लावल्यास घरात धनधान्यात वाढ होते. आर्थिक स्थिती सुधारते. शिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होते. व्यापारात प्रचंड लाभ होतो.