जोतिष शास्त्रानुसार हिंदू धर्मात विविध सण-उत्सव साजरे केले जातात. तर या धर्मात प्रत्येक महिन्याला एक वेगळे महत्व प्राप्त आहे. या महिन्यांनुसार अनेक विशिष्ट उपास-तपास केले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख कृष्ण पक्षाला सुरुवात झाली आहे. तर लवकरच ज्येष्ठ महिनासुद्धा येणार आहे. वैशाख महिन्यात अनेक महत्वाचे उपवास आणि अध्यात्मिक गोष्टी केल्या जातात. जोतिष अभ्यासानुसार यंदाचा वैशाख महिना अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात पवन पुत्र हनुमानासोबतच सूर्य देव आणि वरुण देवाची उपासना करण्याचे सांगण्यात आले आहे.
आज शनिवारच्या दिवशी हनुमान आणि शनीदेवाची उपासना केली जाते. त्यामुळे आजच्या दिवसावर हनुमान आणि शनीची विशेष कृपादृष्टी आहे. राशीचक्रातील बारा राशींवरसुद्धा यांचा सकारत्मक प्रभाव पडणार आहे. वैशाख कृष्ण पक्षात मंगळवारी काही चमत्कारिक योग जुळून येत आहेत. ज्याचा फायदा काही राशींनासुद्धा होणार आहे.
२८ मे २०२४ रोजी येणाऱ्या मंगळवारी वैशाख कृष्ण पक्षात अनेक योग तयार होत आहेत. यामध्ये ब्रह्म योग सर्वार्थ सिद्धी योग सारखे अनेक विशेष योग जुळून आले आहेत. या शुभ योगांचा शुभ परिणाम १२ राशींवरसुद्धा दिसून येणार आहे. सोबतच या राशींवर पवनपुत्र हनुमान देवाची विशेष कृपादृष्टी असणार आहे. पाहूया या राशी नेमक्या कोणत्या आहेत.
मेष राशीच्या लोकांवर मंगळवारच्या दिवशी हनुमान देवाचा सकारात्मक प्रभाव राहणार आहे. हनुमानाला मेष राशीचे आराध्य दैवत समजले जाते. यादिवशी उद्योग-व्यापार वेगाने विस्तारायला लागतील. धनलाभ होईल. त्यामुळे आर्थिक चणचण संपुष्ठात येईल. धार्मिक कार्यांत रुची वाढेल. हातातून अध्यात्मिक गोष्टी घडतील.
सिंह राशींच्या लोकांसाठीसुद्धा हा मंगळवारचा दिवस अतिशय लाभदायक असणार आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात हनुमान देवाची कृपा असणार आहे. त्यामुळे कोणतेही कार्य विनाअडथळा पार पडेल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे पूर्णत्वास जातील. विवाहित लोकांना नात्यामध्ये सुखशांती लाभेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठीसुद्धा हा दिवस खास असणार आहे. याकाळात घरात सुख समृद्धी येईल. आर्थिक गोष्टींमध्ये भरभराटी झालेली दिसून येईल. व्यवसायिकांना नवनव्या ऑर्डर्स मिळतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी प्राप्त होतील. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं तर, जुनाट आजारांपासून मुक्ती मिळून प्रकृती सुधारेल.
संबंधित बातम्या