Vastu Tips: तुम्ही घरात आरसा कुठे लावता यावर तुमच्या घरातील सुख आणि शांती अवलंबून असेल. जाणून घ्या वास्तवात आरशाचे महत्त्व काय आहे.
(1 / 6)
वास्तुशास्त्राच्या मते, आरसा भाग्य बदलू शकतो. जसं त्यामुळे चांगले बदल घडू शकतात तसेच वाईट घटनाही घडू शकतात. आरसा आपल्या जीवनात कसा बदल घडवू शकतो ते जाणून घ्या.(Freepik)
(2 / 6)
वास्तू तज्ज्ञांच्या मते, आरसे आणि काचेचे शो पीस नेहमी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवावेत. यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते.(Freepik)
(3 / 6)
स्वयंपाकघरात आरसा कधीही लावू नये. विशेषतः गॅस-शेगडी किंवा स्टोव्हच्या आसपास आरसा लावू नये. आरशात प्रतिबिंबित होणारी स्वयंपाकघरातील प्रतिमेमुळे भाग्यात वाईट घटना घडू शकतात.(Freepik)
(4 / 6)
आरसा नेहमी भिंतीच्या विरुद्ध असावा म्हणजे एखादी व्यक्ती आरशात पाहत असते तेव्हा त्याचे किंवा तिचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावे. आणि आरसा जमिनीपासून सुमारे ४ ते ५ फूट उंचीवर लावावा.(Freepik)
(5 / 6)
वास्तुशास्त्रानुसार आरशाची चौकट जर लाकडाची असेल तर शांती लाभते. वास्तूसाठी धातूचे फ्रेम असलेले आरसे असण्यापेक्षा लाकडी आरसे चांगले असतात. त्यामुळे खोलीत आरसा लावण्यापूर्वी फ्रेम कोणती आहे हे तपासले पाहिजे.(Freepik)
(6 / 6)
अस्वच्छ आरसे अजिबात ठेवू नयेत. दर दोन दिवसांनी आरसे स्वच्छ करावेत. अस्वच्छ आरशात आपला चेहरा पाहिल्यास, प्रतिमा अशुद्ध दिसेल, यामुळे जीवनात समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरसा स्वच्छ ठेवला पाहिजे. (Freepik)