Tulsi Vivah : तुळशी विवाहात तुमच्या राशीनुसार करा 'या' गोष्टी, माता लक्ष्मी होईल प्रसन्न
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tulsi Vivah : तुळशी विवाहात तुमच्या राशीनुसार करा 'या' गोष्टी, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Tulsi Vivah : तुळशी विवाहात तुमच्या राशीनुसार करा 'या' गोष्टी, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Nov 12, 2024 06:49 PM IST

Tulsi Vivah 2024 : तुळशी विवाह पूजनाला एकादशीपासून सुरवात झाली आहे. मान्यतांनुसार, तुळशी विवाह पूजेमध्ये आपल्या राशीनुसार काही उपाय केल्यास लग्नात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. जाणून घ्या राशीनुसार काय करावे.

तुळशी विवाहाला राशीनुसार काय करावे
तुळशी विवाहाला राशीनुसार काय करावे

दिवाळी झाल्यानंतर सर्वांना ओढ लागते ती म्हणजे तुळशी विवाह उत्सवाची. तुळशी विवाहानंतर लग्न आणि सर्व शुभ कार्य सुरू होतात. तुळशी विवाह पूजन पूर्ण विधीसह शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे. यावर्षी १२ नोव्हेंबरला तुळशी विवाह पर्व सुरू होत आहे. यंदा या काळात नवपंचम राजयोग, शुक्र गुरूचा संसप्तक राजयोग आणि शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण होत आहे.

हिंदू धर्मात असे मानले जाते की जे लोकं तुळशी विवाहाची परंपरा पाळतात, त्यांना कन्यादानासारखेच फळ मिळते. तुळशी विवाह घराच्या अंगणात करावा. यासाठी सूर्यास्तानंतरची संध्याकाळची वेळ निवडा. तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूचे नारायण स्वरूप यांच्याशी तुळशीचा विवाह केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. 

धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्या राशीनुसार काही उपाय करून ग्रहांची स्थिती मजबूत करू शकतात. तसेच माता लक्ष्मीला देखील प्रसन्न करू शकते. मेष ते मीन राशीच्या लोकांनी तुळशी विवाहला करा या गोष्टी, माता लक्ष्मी प्रसन्न होईल.

मेष

मेष राशीच्या लोकांनी तुळशी विवाहाला माता तुळशीला लाल वस्त्र आणि लाल गुलाबाची फुले अर्पण करा.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी तुळशी विवाहाला संध्याकाळी देवीसमोर तुपाचा दिवा लावावा.

मिथुन

तुळशी विवाहाला माता तुळशीला लाल वस्त्र आणि लाल गुलाबाची फुले अर्पण करा.

कर्क

कर्क राशीच्या लोकांनी तुळशी विवाहानिमित्त माता तुळशीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा.

सिंह

सिंह राशीच्या लोकांनी तुळशी विवाहाला देवीला पेढे अर्पण करा आणि तुळशी चालीसा वाचावी.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी तुळशी विवाहाला देवीला हिरवे वस्त्रे घालावेत.

तूळ

तूळ राशीच्या लोकांनी तुळशी विवाहाच्या दिवशी, तुळशीला अत्तर अर्पण करा आणि खीरचा नैवेद्य अर्पण करा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनी तुळशी विवाहाला तुळशीला लाल गुलाब आणि लाल बांगड्या अर्पण करा.

धनु

धनु राशीच्या लोकांनी तुळशी स्रोताचे पठण करावे.

मकर

मकर राशीच्या लोकांनी तुळशी विवाहाला देवीसमोर ५ तुपाचे दिवे लावा.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी देवीला सिंदूरसह सौभाग्याच्या वस्तू अर्पण करावेत.

मीन

मीन राशीच्या लोकांनी देवीला शेंगदाणे अर्पण करावेत.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner