मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  tula vrishchik dhanu Prediction : तुमची रास तुला, वृश्चिक किंवा धनु असेल तर हे वाचा!

tula vrishchik dhanu Prediction : तुमची रास तुला, वृश्चिक किंवा धनु असेल तर हे वाचा!

HT Marathi Desk HT Marathi
Jan 20, 2024 11:36 AM IST

Libra Scorpio Sagittarius rashi bhavishya Today 20 January 2024 : तुला, वृश्चिक व धनु राशीसाठी कसा राहील आजचा दिवस? वाचा तिन्ही राशींचं भविष्य…

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya
Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya

 

तुला (Libra Zodiac)

कुंभायान योगात आज बुद्धीचा कस लावणारे ग्रहमान असल्यामुळं त्याचा फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडं कल राहील. दिवसभर वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी होतील. त्यामुळं तुमचा आनंद अधिकच दुणावेल. मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. खेळाडूंना यशाचं शिखर गाठण्यासाठी भाग्याची उत्तम साथ मिळण्याची शक्यता आहे. हाती घेतलेलं काम यशस्वी होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. सामाजिक कार्यात आपला लौकिक सांभळण्याचा प्रयत्न करावा. शुभ रंगः सफेद शुभ दिशाः आग्नेय. शुभ अंकः ०२, ०७.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

चंद्र आज प्रतियोगात असल्यानं आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर स्वत:चं आरोग्यही जपा. जुन्या पिढीतील लोकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नियोजन आणि शिस्त यात फारकत होईल. व्यावसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरून मानसिक त्रास होईल. भीती वाटेल. प्रेमी युगुलांना एकमेकांच्या वागण्यामुळं मानसिक त्रास होईल. तुमचे विचार दुसऱ्यांशी कमी जुळतील. कोर्टकचेरीच्या भानगडीत पडण्याचं टाळा. प्रकृतीकडं दुर्लक्ष करून जमणार नाही. प्रवासात काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालविण्याचा प्रयत्न करू नका. ग्रहमान प्रतिकूल आहे. आपल्या संशयी स्वभावाला आळा घाला. मनस्ताप देणाऱ्या काही घटना अनुभवास येतील. शुभ रंग: केसरी शुभ दिशाः दक्षिण. शुभ अंकः ०४, ०६.

धनु (Sagittarius Zodiac)

धनु राशीचा स्वामी गुरू आज लाभदायक आहे आणि चंद्रभ्रमण शुभ स्थानातून होत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करियरसाठी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचं स्वागत होईल. नवीन कल्पना अंमलात आणून व नवीन योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना सावध निर्णय घ्या. नात्यात व मैत्रीत सुसंवाद, गोडवा राहील. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. मनातील योजना ठरल्याप्रमाणे पार पाडता येतील. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावं लागेल. वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. शुभ रंग: पिवळा शुभ दिशा: ईशान्य. शुभ अंकः ०३, ०५.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

विभाग