मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : पदप्राप्ती व मान-सन्मानाचा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : पदप्राप्ती व मान-सन्मानाचा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 06, 2024 11:08 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 6 february 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज ६ फेब्रुवारी २०२४ मंगळवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra, Scorpio, Sagittarius
Libra, Scorpio, Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी, चंद्रदेव गुरू हर्षलशी षडाष्टक योग करीत असून, व्यापात आणि हर्षण योगात तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज हर्षण योगात व्यापारात अती उत्साही पणाने निर्णय घेऊ नका. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजी पणा अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल. भावंडांशी वाद संभवतात. कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. अडचणीत आणणारा दिवस आहे. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक: 

आज चंद्र अनुकूल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणीं कडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिनमान असेल.

शुभरंग: तांबडा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

धनु: 

आज षट्तिला एकादशी दिनी व्यापारात व्यवहाराची सांगड योग्य रितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. उतावीळ पणा बाजूला ठेऊन पोक्त विचार करून कामाची आखणी करा. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. परदेशी व्यवहारअसणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे व कुटुंबा तील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०७, ०९.