मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : वृश्चिक राशीच्या लोकांना गृहसौख्य मिळेल! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : वृश्चिक राशीच्या लोकांना गृहसौख्य मिळेल! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 05, 2024 10:02 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 5 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज शुक्रवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

libra scorpio sagittarius
libra scorpio sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज शुक्रवार ५ जानेवारी रोजी, चंद्र तूळ राशीत संक्रमण करणार आहे. तसेच, आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज चंद्र-शनि नवमपंचम योगात शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र जोखीम घेण्याचे टाळावे. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाहीत याची काळजी घ्या. स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये असलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याची शक्यता आहे. अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज शुभयोगामुळे आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल.जुनी येणी वसूल होतील. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. मंगळाच्या प्रभावामुळे स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसाठी शुभयोग आहे. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

धनु: 

आज चंद्राचं अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे लागेल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.काळजीपूर्वक व्यवहार करा.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.