मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : धनु राशीसाठी आनंदी व ऊत्साही दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : धनु राशीसाठी आनंदी व ऊत्साही दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Feb 05, 2024 10:18 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 5 february 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज ५ फेब्रुवारी २०२४ सोमवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Tula, Vrishchik, Dhanu Rashi
Tula, Vrishchik, Dhanu Rashi

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज सोमवार ५ फेब्रुवारी रोजी, चंद्र नेपच्युनशी देखील नवमपंचम योग करीत आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी कसा असेल सप्ताहाचा पहिला दिवस! वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्याआवडी निवडी बदलत राहतील. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. महत्वाची कामे तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या वेळेस पुर्ण होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज आपणास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे आस्थिर आणि चंचलं बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. गुप्तशत्रुपासुन पिडा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता आहे. कायदा व नियमच्या विरोधात काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता आहे. नेहमीच्या कामात खुप मेहनत घ्यावी.

शुभरंग: नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

धनुः 

आज आपणास अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मनात प्रसन्नता असेल. आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्या.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

WhatsApp channel