Tula vrishchik dhanu horoscope : उत्पन्न कमी खर्च अधिक! वाचा तिन्ही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : उत्पन्न कमी खर्च अधिक! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : उत्पन्न कमी खर्च अधिक! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Updated Jan 04, 2024 09:26 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 4 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज गुरुवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य

tula vrishchik dhanu rashi
tula vrishchik dhanu rashi

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज गुरुवार ४ डिसेंबर रोजी चंद्र कन्या राशीतच गोचर करणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी म्हणजेच आज कालाष्टमी आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज हर्षल-चंद्र योगात बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. व्यवसायात लहरीपणा ठेऊन चालणार नाही. कडक बोलण्याने लोकांची मने दुखावली जातील. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. त्यामुळे पथ्यपाणी सांभाळणे हिताचे ठरेल. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळ पणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहील.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक: 

आज हर्षलशी होणारा चंद्रयोग पाहता धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात.मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नाते वाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्या सारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०५, ०८.

धनु: 

आज राशीस्वामी गुरूचं बल उत्तम असल्याने लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नाव लौकिक वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवती पेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. लहरी स्वभाव व व्यसनाधिनता यावर आवर घालावा लागेल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

Whats_app_banner