Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज रविवार ४ फेब्रुवारी रोजी, चंद्र गुरू-हर्षलशी षडाष्टक योग होत असून, तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी कसा असेल सुट्टीचा दिवस! वाचा राशीभविष्य!
आज हर्षल-चंद्र योगात परदेशगमनाचे योग येतील. आर्थिक नवीन गुंतवणूक कराल. घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. स्वतःच्या मताबरोबर इतरांचाही विचार करावा लागेल. वैवाहिक जीवनात कधी नव्हे ते जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. त्यामुळे मुलेही खूष राहतील. व्यापारात भागीदारा सोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहील. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी, फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा.
शुभरंगः नारंगी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०२, ०४.
आज मंगळाच्या नक्षत्रातुन चंद्र गोचर होत आहे. समाजात मान मिळेल. घरामध्ये नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. याचा थोडासा ताणही येईल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न राहणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०९.
आज चंद्र गुरू योगात योगात परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वत:ची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. सार्वजनिक कामची आवड राहील.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०२, ०४.
संबंधित बातम्या