Tula vrishchik dhanu horoscope : तूळ वृश्चिक व धनु राशींसाठी सहकार्याचा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य-tula vrishchik dhanu horoscope today 31 january 2024 libra scorpio sagittarius zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : तूळ वृश्चिक व धनु राशींसाठी सहकार्याचा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : तूळ वृश्चिक व धनु राशींसाठी सहकार्याचा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Jan 31, 2024 09:47 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 31 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज ३१ जानेवारी २०२४ बुधवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

tula vrishchik dhanu
tula vrishchik dhanu

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज बुधवार ३१ जानेवारी रोजी, चंद्र रवि आणि मंगळाशी नवमपंचम योग करीत असून, सुकर्मा योगात तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज स्वनक्षत्रातील चंद्रभ्रमणात तुम्ही जे काम करीत असाल त्यामध्ये तुमच्याशिवाय लोक अडून राहतील. त्यामुळे समाजात मान मिळेल. घरामध्ये नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. याचा थोडासा ताणही येईल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमानाबरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०२, ०४.

वृश्चिक: 

आज रवि-मंगळ संयोगात परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वत:ची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल.

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०९.

धनु: 

आज चंद्राच्या नक्षत्रातून होणाऱ्या चंद्रभ्रमणात नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडिदार भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.