Tula vrishchik dhanu horoscope : तूळ, वृश्चिक व धनुसाठी आनंददायक बातम्या देणारा रविवार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : तूळ, वृश्चिक व धनुसाठी आनंददायक बातम्या देणारा रविवार

Tula vrishchik dhanu horoscope : तूळ, वृश्चिक व धनुसाठी आनंददायक बातम्या देणारा रविवार

Dec 31, 2023 10:02 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 31 December 2023 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आजचा शुक्रवारचा दिवस कसा असेल? पाहा!

Tula, vrishchik, dhanu
Tula, vrishchik, dhanu

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : रविवार ३१ डिसेंबर रोजी, चंद्र सिंह राशीत संक्रमण करत असून, रवि-मंगळ-बुध या तिन ग्रहांशी नवमपंचम योग करीत आहे. वक्री गुरू मार्गी होत आहे. प्रीति योगात सुट्टीचा आणि वर्षातील शेवटचा दिवस कसा असेल! वाचा तूळ, वृश्चिक व धनुचे राशीभविष्य!

तूळ: 

आज शुभस्थानातील बुध पाहता ग्रहमान अनुकूल आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक झाल्यामुळे निवांत रहाल. मोठे प्रवासाचे योग येतील. व्यवसायात कामाची पद्धत आखीव आणि आधुनिक असल्यामुळे कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना चलती जाणवेल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंद दायक बातम्या मिळतील. प्रेमियुगुलांना काळ प्रतिकुल आहे.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज ग्रहयोग अनुकूल राहतील. मनाविरुद्ध जर काही घडले तर सकारात्मक विचारामुळे उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात तर याचे महत्त्व फारच राहील. फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती उल्लेखनीय असेल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

धनुः 

आज गुरूबल शुभ राहिल्याने व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग आहेत.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

Whats_app_banner