मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : तूळ राशीच्या लोकांना बढतीचे योग, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : तूळ राशीच्या लोकांना बढतीचे योग, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 30, 2024 09:52 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 30 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज ३० जानेवारी २०२४ मंगळवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra Scorpio Sagittarius
Libra Scorpio Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज मंगळवार ३० जानेवारी रोजी, चंद्र-केतु युती, अतिगंड योग आणि कौलव करणाच्या प्रभावात तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज अतिगंड योगात खूप दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.

वृश्चिकः 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेता नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संतती साठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल. स्वतःला प्रकाशात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.

धनुः 

आज चंद्र योग अनिष्ट स्थानात होत असल्याने तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्या साठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. अगदी साधी गोष्टसुद्धा संघर्षा शिवाय होत नाही हा अनुभव घेतल्यानंतर लढा देण्याची पात्रता अंगी बाणवाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. आपल्या कामात मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. मानसिक स्वास्थ राखा.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.