Tula vrishchik dhanu horoscope : वृश्चिक राशीला नशीबाचे पाठबळ लाभेल, वाचा तिन्ही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : वृश्चिक राशीला नशीबाचे पाठबळ लाभेल, वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : वृश्चिक राशीला नशीबाचे पाठबळ लाभेल, वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Updated Jan 03, 2024 09:10 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 3 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज बुधवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

tula vrishchik dhanu
tula vrishchik dhanu

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज बुधवार ३ डिसेंबर रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज राहु-चंद्र प्रतियोगात शुभफले मिळतील. कोणतेही काम करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे अधिक स्रोत विकसित करण्याच्या स्थितीत असाल. तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही मिटतील. नवीन कार किंवा घर खरेदी करण्याची परिस्थिती होईल. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. शासकीय सेवेत नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे.कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडाकडून मदत मिळेल.व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. लेखक कला क्षेत्रातील व्यक्तींना शासकीय मानसन्मान मिळेल. आजचा दिवस ठरविल्याप्रमाणे कामे पार पाडण्यात उपयुक्त असा आहे. आर्थिक लाभ होतील. उन्नतीकारक दिवस आहे. एकंदरित शुभ फलदायी दिवस राहील

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.

वृश्चिक: 

आज चंद्र-केतु ग्रहबल उत्तम राहील. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो. विरोधकही शांत होतील. परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी इच्छुक असलेल्यांनी प्रयत्न करावेत. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल. नशीबाचे पाठबळ लाभणार आहे. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढ़ती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील.दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. साहित्यिक संपादन या बौद्धिक अधिष्ठान असणाऱ्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक बाबतीत वाढ होईल.

शुभरंगः तांबडा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०२, ०८.

धनुः 

आज चंद्र गोचरात प्रतिकूल असल्याने प्रतिकूलता जाणवेल. वैवाहिक जीवनाबद्दल थोडे सावध राहावे लागेल. जोडीदाराशी वारंवार मतभेद होतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत वाढवण्यासाठी कठोर परिश्रम कराल आणि त्याचे फायदे देखील मिळतील. गोड बोलण्याने बरीच कामे मार्गी लावता येतील. कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारात भागीदारा सोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहिल. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योगआहे. लक्ष्मीची अवकृपा रहिल. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. आर्थिक हानीची शक्यता वाटते. चिंता वाढविणारा दिवस असुन मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

Whats_app_banner