Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज गुरुवार २५ जानेवारी रोजी,चंद्र मिथुन राशीत संक्रमण करत असून, पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव राहील. कसा असेल तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!
आज गुरुपुष्यामृत योगात काही भाग्यदायक घटनाही घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. काहीबाबतीत गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. व्यवसायात कामगारांच्या सहकार्याने कामाचा गाडा बराच ओढून न्याल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. ललित कला व शिल्पशास्त्रांकरीता तसेच कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. आपल्या तार्किक बुद्धीने प्रति स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०१, ०५.
आज राशीस्वामी मंगळ शुभस्थानात असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. मुलांसाठी वाट्टेल ते करणारी तुमची मनोवृत्ती असली तरी त्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिनमान राहील.
शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०२, ०६.
आज चंद्रबल उत्तम असल्याने अत्यंत शुभ दिनमान असेल. नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. परंतु त्याचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्टया मुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहिल. आपल्या वाणीचा इतरावर प्रभाव राहील.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.