मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक वृद्धीचा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक वृद्धीचा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 24, 2024 10:26 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 24 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज २४ जानेवारी २०२४ बुधवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra, Scorpio, Sagittarius
Libra, Scorpio, Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज बुधवार २४ जानेवारी रोजी,चंद्र मिथुन राशीत संक्रमण करत असून, पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव राहील. कसा असेल तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आजचं चंद्रबल विचारात घेता कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. खर्चिक आणि उधळ्या स्वभावाला आळा घालावा लागेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०८.

वृश्चिक: 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेता कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धाडस आणि कामाचा उरक चांगला राहील. व्यवसायात कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार नाही. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. करिअर मध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

शुभरंगः नांरगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.

धनु: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद निर्माण होतील. व्यापारात व्यवहाराची सांगड योग्यरितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क रहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.