आज चंद्र गोचर अनुकूल राहील. मनाविरुद्ध काही घडलं तरी सकारात्मक विचारामुळं उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात याचा फायदा होईल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ संभवतो. दूरवरच्या प्रवासाचा योग आहे. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. उत्साह न गमावता जोमानं, चिकाटीनं प्रयत्न करावा. परिस्थितीवर मात कराल. अपेक्षित यश मिळेल. अर्थिक व्यवहार करताना तात्पुरत्या फायद्याकडं लक्ष देऊ नका. दूरचा विचार करा. मुलांकडून अनेक चांगल्या आणि आनंददायक बातम्या मिळतील. शुभ रंग: राखाडी शुभ दिशा: आग्नेय. शुभ अंकः ०२, ०७.
चंद्रबल शुभ आहे. त्यामुळं सर्व काही सुरळीत होण्याचा दिवस आहे. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. हजरजबाबी स्वभावामुळं लोकांवर प्रभाव पडेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटतील. नवीन वाहन व घर खरेदीचा योग आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. लोकांमध्ये मिसळाल. त्यातून आनंद मिळेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. शुभ रंग: भगवा शुभ दिशा: दक्षिण. शुभ अंकः ०४, ०८.
आज चंद्र केतूच्या नक्षत्रातून गोचर करत आहे. व्यवसायिकांसाठी उत्तम काळ आहे. कर्जफेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळं तुमचा फायदा होऊ शकतो. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवे मित्र भेटतील. तुमचे सुप्त गुण प्रकर्षानं उजळून निघतील. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी नोकरीत असलेल्या जातकांना बढतीचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्यानं समाधानी राहाल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायकांना प्रसिद्धी मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. शुभ रंगः पिवळसर शुभ दिशाः ईशान्य. शुभ अंकः ०३, ०७.
संबंधित बातम्या