Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज मंगळवार २३ जानेवारी रोजी,चंद्र मिथुन राशीत संक्रमण करत असून, वैधृती योगात कसा असेल तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!
आज चंद्रबल अनिष्ट अशुभ परिणाम देईल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. वैचारिक भेदामुळे कौटूंबिक नात्यामध्ये दूरी येण्याचे योग आहेत. पालकांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
शुभरंग: नारंगी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०६.
आज राशीस्वामी बुध मंगळाशी संयोग करतोय. संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संतती कडून चांगली बातमी मिळेल.
शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.
आज चंद्र, बुध आणि मंगळाशी प्रतियोग करीत आहे. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील.भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. आपल्या समोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येतील. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.
शुभरंग: पिवळसर. शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.
संबंधित बातम्या