Tula vrishchik dhanu horoscope :मनोबल वाढवणारा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य-tula vrishchik dhanu horoscope today 22 january 2024 libra scorpio sagittarius zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope :मनोबल वाढवणारा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope :मनोबल वाढवणारा दिवस, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Jan 22, 2024 10:54 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 22 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज सोमवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra Scorpio Sagittarius
Libra Scorpio Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज सोमवार २२ जानेवारी रोजी,अमृत आणि ऐंद्र योगात कसा असेल तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी पहिला सोमवार, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज शुभ स्थानातील चंद्रभ्रमणात वृद्धी होईल. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्या मुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. विद्यार्थीवर्गासाठी आजचा दिवस शुभ राहिल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०६, ०९.

वृश्चिक: 

आज अनपेक्षित फळे मिळण्याची शक्यता आहे. चंद्रभ्रमण हे अशुभ स्थानातून होत आहे. कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०२, ०८.

धनु: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अंत्यत शुभ दिवस आहे. आकस्मिक लाभ होतील. आपल्या वाणीचा प्रभाव इतरावर पडेल. मनस्वास्थ उत्तम राहिल. भाग्यकारक घटना घडतील. शत्रूला पूर्णपणे कोंडीत प्रहार करण्यावर तुमचा भर राहील. तुमची कामे सहजगत्या होणार आहेत. नशिबाची साथ चांगली मिळेल. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील.जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. प्रकृती स्थिर राहिल. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे.

शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.