Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज चंद्र शुक्र आणि मंगळाशी संयोग करीत आहे. आयुष्मान योगात तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी कसा असेल बुधवार! वाचा राशीभविष्य!
आज आयुष्मान योगात खूप दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची येजा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक प्रगती करणारा दिवस ठरेल.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.
आज चंद्राची स्थिती लक्षात घेता स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम राहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.
आज चंद्र योग अनिष्ट स्थानात होत असल्याने तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्या साठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. अगदी साधी गोष्टसुद्धा संघर्षाशिवाय होत नाही हा अनुभव घेतल्यानंतर लढा देण्याची पात्रता अंगी बाणवाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. आपल्या कामात मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. मानसिक स्वास्थ सांभाळा.
शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.