Tula vrishchik dhanu horoscope : धनु राशीच्या लोकांनी सतर्क राहा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : धनु राशीच्या लोकांनी सतर्क राहा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Tula vrishchik dhanu horoscope : धनु राशीच्या लोकांनी सतर्क राहा! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य!

Feb 20, 2024 10:07 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 20 february 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज २० फेब्रुवारी २०२४ मंगळवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Tula Vrishchik Dhanu
Tula Vrishchik Dhanu

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : एकादशीचा चंद्र मिथुन राशीत संक्रमण करीत असून, बव करणात तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी कसा असेल मंगळवार! वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आजचं चंद्रबल विचारात घेता नोकरीत योग्य संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल. येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तर्कशुद्ध विचारांचा मागोवा घ्यावा लागेल. घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. कामाला जास्त महत्त्व द्याल. खूप नकारात्मक विचार मनात येतील. त्यांना सकारात्मक बनवलेत तर कामे पुढे जातील. मनावरचा ताण बर्‍या पैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०८.

वृश्चिक: 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेता एक प्रकारचा उत्साह अंगी संचारेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. व्यवसायात साम दाम दंड भेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. बोलण्याची हातोटी चांगली असल्यामुळे तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरातआणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल.

शुभरंगः नांरगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.

धनु: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. थोडी निराशा वादी प्रवृत्ती राहील. करियरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्या कडे लक्ष दया. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क रहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वैद्यकीय बाबीवर खर्च होईल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०५, ०७.

Whats_app_banner