Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी, चंद्र तूळ राशीत भ्रमण करणार असून, राहुचं नक्षत्र आणि शुल योग कोणत्या राशींसाठी फलदायी ठरणार! तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!
आज राहु-हर्षल प्रतियोगात आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील. परंतु खर्चही वाढल्यामुळे हातात पैसा मात्र रहाणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल घरामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांची सांगड योग्य तऱ्हेने घालावी लागेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल. इतरावर आपला प्रभाव राहील.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०३, ०४.
आजचं चंद्रभ्रमण आपणास भाग्यकारक अनुभव देणारा आहे. तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. चित्रकार शिल्पकारांना अनेक संधी दार ठोठावतील. परदेशग मनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत मोजकेच काम करा पण ते बिनचूक असल्याची खात्री करा. पैशाबाबत काटेकोर रहाल आणि इतरांनीही तसे रहावे अशी तुमची इच्छा असेल. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल.
शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.
आज अनिष्ट चंद्रभ्रमणात एखादा निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल. नको त्या गोष्टींवर खल करत बसाल आणि हातात मात्र काहीच पडणार नाही. करियरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणारांनी अवश्य काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल.आपणास काहीस त्रासदायक ठरणार आहे. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आळसीवृत्ती टाळावी. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती मध्ये नविन समस्या उद्भवतील. अचानक संकट येण्याची संभावना आहे. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.