Tula vrishchik dhanu horoscope : तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांवर दुर्गेची कृपा ! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांवर दुर्गेची कृपा ! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांवर दुर्गेची कृपा ! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Jan 18, 2024 10:07 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 18 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज गुरुवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra, Scorpio, Sagittarius
Libra, Scorpio, Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज गुरुवार १८ जानेवारी रोजी, चंद्र मेष राशीत असून, दुर्गाष्टमी आणि सिद्ध योग असा दुहेरी शुभ योग आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!

तूळ 

आज चंद्र भ्रमणात आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. थोडीशी चैन आणि खरेदीचा मोह होईल. घरातील काही गोष्टींसाठी पैसाही खर्च कराल. समजुतदारपणाचे धोरण स्वीकारावे लागेल. कलाकारांना चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेचे चीज होईल. संकल्प पूर्ण करण्याकरिता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. आपला स्वभाव फार उदारमतवादी राहील. आपल्या चैनी स्वभावावर आळा घालावा लागेल. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०९.

वृश्चिकः 

आज शुक्र राशीबदलात व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. वाचन लिखाण करायला सवड मिळेल. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक येईल. घर बदल करण्याचे योग आहेत. तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागतच होईल. व्यवसायात अपेक्षित पैसे लवकर हाती न पडल्यामुळे स्पर्धक त्याचा फायदा घेतील. रोजगारात स्पष्ट धोरणामुळे अनुकूलता निर्माण होईल. दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायातील पत वाढेल. शेअर बाजार आणि विमामुळे लाभ होतील. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दुरचे प्रवास घडणार आहेत. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदादी पार पाडाल. दिवसभर मन प्रसन्न राहिल.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०९.

धनुः 

आज चंद्र शुभस्थानातून गोचर करत असताना कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तरी त्या कर्तव्यनिष्ठेने त्या पारही पाडाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी कष्ट घेतले तरचं मनाजोगे यश मिळेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. शासकीय कामकाजा साठी शुभ दिवस आहे. मित्रांकडून मदत मिळेल. अपयशाची भिती न बाळगता कष्ट करत रहा.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

 

Whats_app_banner