मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : धनु राशीच्या लोकांना आकस्मिक धनलाभाचे योग ! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : धनु राशीच्या लोकांना आकस्मिक धनलाभाचे योग ! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 17, 2024 09:21 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 17 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज बुधवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra, Scorpio, Sagittarius
Libra, Scorpio, Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज बुधवार १७ जानेवारी रोजी, चंद्र मीन राशीत असून, दिवसावर बुध आणि शुक्राचा विशेष प्रभाव राहील. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज चंद्र प्रतियोगात तुमच्या अत्यंत सौम्य व शांत स्वभावाचा फायदा कोणी घेत नाही ना याकडे लक्ष द्या. घरामध्ये कोणाच्याही आजार पणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यां मधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकां च्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला.

शुभरंग: नारंगी, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

वृश्चिकः 

आज चंद्रबल अनुकूल राहतील. व्यवसायात नुसते ज्ञान असून चालणार नाही तर ते कोणत्या पद्धतीने वापरावे याचाही अभ्यास करावा लागेल. व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी शांतता मिळेल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती उल्लेखनीय असेल.

शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.

धनुः 

आज ग्रहबलं शुभ राहिल्याने प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल. ऐषारामी जीवन जगावे असे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाहेच्छूना आपला साथीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग आहेत.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.