Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज ऐंद्र योग आणि बालव करण आहे. दुर्गाष्टमी दिनी तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी कसा असेल शनिवार! वाचा राशीभविष्य!
आज शुक्र-चंद्र संयोगात लाभदायक दिवस आहे. हातात पैसा आल्या मुळे बरीच देणीही देऊन टाकाल. व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. यामुळे रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग रहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विदयार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. गृहस्थी जीवन जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत घार पाडाल. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे.
शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.
आज बालव करणात सहकारातुन यशप्राप्ती लाभेल. पैशाची कामे मनासारखी घडतील. संशोधन क्षेत्रात काम करणार्यांची प्रगती होईल. परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. दिनमान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होईल.
शुभरंगं: तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.
आज गुरूबल उत्तम राहील. अत्यंत शुभ दिवस असेल. नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. आपसातील वाढ समझदाराने मिटवा. भावडांशी वादविवाद टाळा. सामाजिक कार्यक्रम साहित्यिक चळवळ व्यासपीठ इत्यादी माध्यमातून आपला नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.
संबंधित बातम्या