मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : तूळ राशीच्या लोकांचा यशामुळे उत्साह वाढेल! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : तूळ राशीच्या लोकांचा यशामुळे उत्साह वाढेल! वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 16, 2024 09:32 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 16 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज मंगळवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra, Scorpio, Sagittarius
Libra, Scorpio, Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज मंगळवार १६ जानेवारी रोजी, चंद्र मीन राशीत व उत्तराभाद्रपद नक्षत्रात संक्रमण करेल. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी कसा राहील किंक्रांतीचा दिवस, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज चंद्र अनुकूल असल्याने स्थिती राहणार आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. त्याचा फायदा कामासाठी होईल. पैसे मिळाले तरी ठरवलेल्या कारणासाठीच पैसा खर्च कराल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. तुमच्या स्वभावातील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये वाढ होईल. विचारा अंतीच काळजी पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. मुलांकडून समाधान लाभेल. आज आर्थिक लाभ होतील.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज चंद्र-केतु प्रतियोग असल्यामुळे सरकारी कामकाजामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल त्यामुळे कामाची गती वाढून फायदा होईल. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील. व्यापारात नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग मिळेल.

शुभरंग: नांरगी, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

धनुः 

आज आज कौलव आणि तैतील करणाचा प्रभाव असल्याने वडिलोपार्जित धंद्यामध्ये वाढ कराल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात बरीच उलाढाल कराल. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील. आत्मविश्वास वाढीस लागल्याने कठीण पेचप्रसंगावर सहज मात कराल. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. सामाजिक कार्यात सक्रीय भूमिका राहील. व्यापार रोजगार चांगला चालेल. मुलांसंबंधातील कामात प्रगती होईल.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.