मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : तूळ व वृश्चिक राशीसाठी सुखद तर धनु राशीसाठी तणावाचा दिवस ! वाचा राशी भविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : तूळ व वृश्चिक राशीसाठी सुखद तर धनु राशीसाठी तणावाचा दिवस ! वाचा राशी भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 14, 2024 10:08 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 14 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज रविवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra, Scorpio, Sagittarius
Libra, Scorpio, Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज रविवार १४ जानेवारी रोजी, चंद्र कुंभ राशीत राहील. शनि-चंद्राचा विषयोग घटीत होणार आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी कसा राहिल सुट्टीचा दिवस, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज ग्रहयोग उत्तम साथ देतील. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्तच शक्ती खर्च करावी लागेल. संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्यामुळे तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर विचार करावा लागेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.

वृश्चिक: 

आज शनि-चंद्र युतीत आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टींबाबत निरीच्छ रहाल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. आकस्मिक लाभाचा योग आहे.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.

धनु: 

आज ग्रहमान प्रतिकुल असल्याने घरातील काही कारणांमुळे मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. हातात पैसा आल्यामुळे बरीच देणीही देऊन टाकाल. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा.

शुभरंगः पिवळसर., शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.