मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : तूळ व वृश्चिक राशीसाठी नैराश्याचा तर धनु राशीसाठी उत्साहाचा दिवस ! वाचा भविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : तूळ व वृश्चिक राशीसाठी नैराश्याचा तर धनु राशीसाठी उत्साहाचा दिवस ! वाचा भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 12, 2024 09:41 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 12 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज शुक्रवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra Scorpio Sagittarius
Libra Scorpio Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज शुक्रवार १२ जानेवारी रोजी, चंद्र मकर राशीत संक्रमण करणार आहे. तसेच, आज पौष मासारंभ होत आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज चंद्रबल अनिष्ट आहे. समोरच्या माणसाच्या गूढ वागण्याचा थोडा त्रासच होणार आहे. कोणालाही जामीन राहू नये. कधी कधी दुसऱ्यांचा विचार न करता बोलणे झाल्यामुळे दुसऱ्यांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडा उद्धटपणा आणि अतिशयोक्ती बोलणे आवरायला लागेल. विधायक गोष्टी कराल पण भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. मन लावून काम करा. व्यापारात नवीन योजना असतील तर आज टाळा.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

वृश्चिकः 

आज चंद्रभ्रमण प्रतिकूल परिणाम देणारं आहे. लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नको तेथे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करियरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. कोणतेही संशोधन चांगले कराल. खोट्याचा किंवा नको त्या गोष्टीचा आधार मात्र घेऊ नका. अशा गोष्टी तुम्हाला गोत्यात आणू शकतात.कोणताही निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार ठोठावून निघून जाण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश जाणवेल. व्यापारात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०५.

धनुः 

आज चंद्रबल लाभल्याने आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्याना आदर वाटेल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती आनंद दायक वातावरण राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. राजकारणातील व्यक्तींना पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.