मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : आरोग्याच्या तक्रारी, चिडचिडेपणा वाढेल! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : आरोग्याच्या तक्रारी, चिडचिडेपणा वाढेल! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Jan 11, 2024 09:26 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 11 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज गुरुवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra Scorpio Sagittarius
Libra Scorpio Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज गुरुवार ११ जानेवारी रोजी, चंद्र धनु राशीत संक्रमण करणार आहे. तसेच, आज मार्गशीर्ष अमावस्या तिथी आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज शुक्र-चंद्र युतीत मुलाच्या भन्नाट कल्पनांमुळे चक्रावून जाल. कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. दुसऱ्याना काही कळू न देता जेवढ्या गुप्त गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढ्या करणार आहात. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळ पणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्या साठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहिल. उष्णतेचे विकार उद्‌भवतील.

शुभरंगः भगवा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिक: 

आजचा चंद्रयोग पाहता घरामध्ये अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या नवीन योजनांना दाद मिळेल. परदेशगमनाच्या संधी मिळतील. सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्या सारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या.

शुभरंगः तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०५, ०८.

धनु: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने व्यवसायात सतत काहीतरी उलाढाल करत रहाल. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. प्रवासात काळजी घ्यावी. नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी रहाल. तरुणांच्या अती आधुनिक वागण्यामुळे त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबा तील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवती पेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. लहरी स्वभाव व व्यसनाधिनता यावर आवर घालावा लागेल.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

WhatsApp channel