मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : धनु राशीच्या लोकांनी प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : धनु राशीच्या लोकांनी प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 11, 2024 11:19 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 11 february 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज ११ फेब्रुवारी २०२४ रविवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra Scorpio Sagittarius
Libra Scorpio Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : चंद्रदर्शनचा देखील योग आहे. परिघ आणि शिव योगात तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी कसा असेल सुट्टीचा दिवस! वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा.कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज चंद्राशी होणारा ग्रहांचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल.

शुभरंगं: तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

धनुः 

आज प्रतिकूल ग्रहयुतीमुळे दुर्मिळ गोष्टींचा संग्रह कराल. झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.