Tula vrishchik dhanu horoscope : तूळ राशीच्या लोकांनी घाईगडबड करू नका! वाचा तिन्ही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : तूळ राशीच्या लोकांनी घाईगडबड करू नका! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : तूळ राशीच्या लोकांनी घाईगडबड करू नका! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Jan 10, 2024 09:27 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 10 January 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज बुधवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

libra, scorpio, sagittarius
libra, scorpio, sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज बुधवार १० जानेवारी रोजी, चंद्र धनु राशीत संक्रमण करणार आहे. तसेच, आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज ग्रहयुतीत व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले होईल. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील. अशा चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

शुभरंग: नारंगी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०२, ०७.

वृश्चिकः 

आज आपल्या राशीत होणारा शुभयोगामुळे जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील.

शुभरंग: तांबूस, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०१, ०९.

धनु: 

आज चंद्राचं अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहिल. आर्थिक स्थिती सुधारण्या साठी थोडा काळ थांबावे लागेल. रात्रीचे जागरण टाळा. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.

Whats_app_banner