Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज सोमवारी सोमदेव [चंद्र] शुक्राच्या प्रभावात राहणार आहे. आयुष्यमान योगात कसा असेल नववर्षातील पहिलाच दिवस! वाचा तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांचे राशीभविष्य!
आज चंद्रबल अनिष्ट आहे. आपणास नोकरीत तणावमय परिस्थिती उद्भभवण्याची शक्यता आहे. व्यवसायात नुसते ज्ञान असून चालणार नाही तर ते कोणत्या पद्धतीने वापरावे याचाही अभ्यास करावा लागेल. अज्ञान जाणवल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमच्या कोणत्याही कामात जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. व्यवसायात आर्थिक व्यवहारात सावध रहा. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविदाचे प्रसंग टाळा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. कलाक्षेत्रात केलेल्या कामाचे चीज होणार नाही. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्भवतील. वाहन चालविताना खबरदारी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळा. शत्रुपक्ष वरचढ होतील. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०२, ०७.
आज चंद्र गोचर लाभ स्थानातून होत असुन राहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. हाता खालच्या व्यक्तींकडून चांगले काम करून घेण्यावर भर राहील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगला राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली होईल. नव्या संधीचा फायदा होईल. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. मित्रांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल. आरोग्य ठीक राहणार आहे. आर्थिक बाबतीत मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासातुन आर्थिक फायदा होईल.
शुभरंग: भगवा, शुभदिशा: दक्षिण, शुभअंकः ०४, ०८.
आजचं चंद्रभ्रमण शुभ असल्याने नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे सफल होतील. जुनी येणी बसूल होतील. आपल्या कार्य क्षेत्रात आपल्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. नवीन वस्तु खरेदीकडे मन झुकेल. आपल्या कार्य पद्धतीत बदल फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मुलाची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षे प्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. विदेश भ्रमणाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील.
शुभरंगः पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.