मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula vrishchik dhanu horoscope : वृश्चिक राशीसाठी अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Tula vrishchik dhanu horoscope : वृश्चिक राशीसाठी अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर, वाचा तीन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 01, 2024 10:23 AM IST

Libra Scorpio Sagittarius zodiac today 1 february 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आज १ फेब्रुवारी २०२४ गुरुवारचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य!

Libra, Scorpio, Sagittarius
Libra, Scorpio, Sagittarius

Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : आज गुरुवार १ फेब्रुवारी रोजी, बुध ग्रहाचे राशीपरिवर्तन होणार असून, राहु-नेपच्युन या ग्रहांचा प्रतियोग कोणत्या राशीसाठी लाभदायक असेल! तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!

तूळ: 

आज चंद्रभ्रमण शुभ स्थानातुन होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे सफल होतील. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.

वृश्चिकः 

आज चंद्राशी होणारा इतर ग्रहांचा योग पाहता ग्रहांची अनुकूलता आहे. तुमच्या अंगच्या धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. सफलतेचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्याचं वर्चस्व मान्य करावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल.

शुभरंगः केशरी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०३, ०६.

धनुः 

आज धृती योगात प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अपेक्षित कार्य पूर्ण करण्या साठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०१, ०९.