Pamlistry in Marathi: केवळ तळहाताच्या रेषाच नव्हे, तर त्यावर तयार झालेल्या खुणा आणि चिन्हांचाही व्यक्तीच्या जीवनावर विशेष परिणाम होतो. हस्तरेषाशास्त्रानुसार तळहातावर अनेक प्रकारच्या शुभ-अशुभ खुणा असतात, त्यापैकी एक म्हणजे त्रिशूळ चिन्ह. तळहातावरील त्रिशूळ चिन्हाच्या स्थितीवरूनच शुभ-अशुभ परिणामांचे मूल्यमापन केले जाते. शनी पर्वतावरील त्रिशुळाचे तळहातातील चिन्ह अत्यंत शुभ मानले जाते. जाणून घ्या शनिपर्वतावर त्रिशूळ बनवण्याचे फळ काय असते ते.
तळहातावर कुठे असतो शनीचा पर्वत तळहाताच्या मध्यभागी मधल्या बोटाखाली शनीचा पर्वत असतो. हाताच्या सर्वात मोठ्या बोटाला मधले बोट म्हणतात.
हिंदू धर्मात त्रिशूळ चिन्ह हे भगवान शंकराचे प्रतीक मानले जाते. शनी पर्वतावर शिवाचे प्रतीक असलेल्या त्रिशुळाचे चिन्ह असणे हे खूप भाग्यवान मानले जाते. असे म्हटले जाते की, शनी पर्वतावरील त्रिशुळाची खूण फार कमी लोकांच्या तळहातावर आढळते. शनी पर्वतावर त्रिशूळ चिन्ह असलेली व्यक्ती अत्यंत भाग्यवान असते. अशा व्यक्तीला जीवनात यश प्राप्त होते, असे म्हटले गेले आहे. अशा व्यक्ती आयुष्यात यशस्वी स्थान प्राप्त करतात. ते आत्मसुधारणेवर किंवा आत्मोन्नतीवर भर देतात. शनी पर्वतावर त्रिशूळ धारण करणाऱ्या व्यक्तीकडे धन, पैसा पुरेशा प्रमाणात रहात असतो. असे त्रिशूळ चिन्ह असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला क्वचितच पैशांची कमतरता भासत असते.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीप्रमाणे त्याच्या तळहातावर नऊ ग्रहांचे स्थान असते. हाताच्या बोटांखालील पर्वत कोणत्या तरी ग्रहाशी निगडित असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या बोटाखालील जागेवर त्रिशूळ चिन्ह तयार झाले असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. हृदयरेषेतून शनीच्या पर्वतावर येणाऱ्या भाग्यरेषेमुळे त्रिशूळ चिन्ह तयार होते.
हस्तरेषाशास्त्र सांगते की तळहातावरील त्रिशुळाची सरळ खूण फायदेशीर ठरते. ज्या व्यक्तीच्या तळहातावर उलट्या त्रिशुळाची खूण असते ते चिन्ह कमी प्रभावी असते, असे मानले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.