मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tripushkar yog : त्रिपुष्कर योगासह जुळून आले विविध शुभ योग!मनासारखा जोडीदार ते चांगली नोकरी मिळणार, अनेक लाभ

Tripushkar yog : त्रिपुष्कर योगासह जुळून आले विविध शुभ योग!मनासारखा जोडीदार ते चांगली नोकरी मिळणार, अनेक लाभ

Jul 06, 2024 08:28 AM IST

Tripushkar yog : सर्व शुभ योगांचा राशीचक्रातील बाराही राशींवर प्रभाव पडतो. आज त्रिपुष्कर योगासह जुळून आलेल्या शुभ योगांचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आणि त्या नशीबवान राशी कोणत्या ते जाणून घेऊया.

त्रिपुष्कर योग
त्रिपुष्कर योग

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र सतत भ्रमण करत असतो. चंद्राच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्याने विविध योग जुळून येतात. आज शनिवार ६ जुलै २०२४ रोजी चंद्र मिथुन राशीतून निघून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या गोचरमधून त्रिपुष्कर योग निर्माण होत आहे. त्रिपुष्कर योगासह आज हर्षण योग, आणि पुनर्वसू नक्षत्राचा शुभ संयोग पाहायला मिळत आहे. शिवाय आज आषाढ महिन्याची सुरुवात झाली आहे. या सर्व शुभ योगांचा राशीचक्रातील बाराही राशींवर प्रभाव पडतो. आज त्रिपुष्कर योगासह जुळून आलेल्या शुभ योगांचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आणि त्या नशीबवान राशी कोणत्या ते जाणून घेऊया.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज त्रिपुष्कर योगाचा दिवस अत्यंत खास असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी आज कोणतेही काम जिद्दीने केले तर तुम्हाला त्यात यश नक्कीच मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. उद्योग-व्यापारात आर्थिक फायदा होईल. शिवाय या राशीच्या लोकांना विविध मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे. मिळतीचे नवे मार्ग सापडतील. पैसे हातात आल्याने सुखसमृद्धी वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. बाहेर फिरायला जाण्याची योजना आखली जाईल.

कन्या

आज त्रिपुष्कर योग आणि हर्षण योगाचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. आज तुम्हाला धनलाभ होण्याचा खास योग आहे. अनेपक्षित मार्गाने धन मिळाल्याने मन उत्साही राहील. करिअरमध्ये वेगाने प्रगती झालेली दिसून येईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांना लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळतील. शिवाय परदेशवारीचा योग जुळून येत आहे. अनेक दिवसांपासून एखादी जमीन किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आज त्या दिशेने पाऊले पडतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज त्रिपुष्कर योगाचा दिवस उत्तम असणार आहे. आजच्या योगात वृश्चिक राशीच्या लोकांनां नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नोकरदार वर्गाची चांगली प्रगती होईल. कलाकौशल्यांचे वरिष्ठकांकडून कौतुक होईल. केलेल्या कामातून चांगला आर्थिक फायदा होईल. पुरेसा पैसा मिळाल्याने घरात भौतिक वस्तूंची खरेदी कराल. घरातील वातावरण आनंदमय असेल. व्यापरी वर्गाला गुंतवणुकीतून लाभ मिळेल. शिवाय नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळेल. जोडीदारासोबत संबंध अधिक घट्ट होतील.

धनु

धनु राशीच्या लोकांना त्रिपुष्कर योगाचा फायदा मिळणार आहे. याकाळात तुमच्यात एक नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल. आर्थिक आवक प्रचंड वाढेल. मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. धनलाभ झाल्याने आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. शिवाय याकाळात गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक कामात प्रचंड उत्साह जाणवेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची पूर्ण साथ लाभेल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते.घरातील वातावरण खेळीमेळीचे असणार आहे.

WhatsApp channel
विभाग