आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. शिवाय आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. पंचांगानुसार आज दिवसभर ही तिथी कायम असणार असणार आहे. शिवाय नवग्रहांमध्येसुद्धा विविध हालचाली पाहायला मिळत आहेत. ग्रहांच्या स्थान बदलामुळे विविध योग जुळून येत आहेत. त्यातीलच एक योग म्हणजे त्रिपुष्कर योग होय. हा योग राशीचक्रातील काही राशींसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार नऊ ग्रह राशीचक्रावर मोठा प्रभाव टाकत असतात. वास्तविक या ग्रहांच्या स्थान बदलामुळे जे योग तयार होतात त्यावरुनच राशींचे भविष्य ठरत असते. नवग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असल्याने विविध योग घटित होतात. आजसुद्धा असेच काहीसे झाले आहे. आज त्रिपुष्कर योगासोबतच ब्रह्म योग, सर्वार्थ सिद्धी योग, सूर्य नारायण योग असे विविध शुभ योग जुळून आले आहेत.
वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिपुष्कर योग खास ठरणार आहे. आजच्या दिवशी कुटुंबाबासोबत असलेले किरकोळ मतभेद दूर होतील. घरामध्ये आनंद आणि सुखसमृद्धी येईल. शिवाय आज सुट्टी असल्याने मन अगदी प्रसन्न आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी मिळेल. कमाईचे नवे मार्ग खुले होतील. व्यवसायिकांना मोठा आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने दान-धर्म करण्यावर विश्वास ठेवाल. सुट्टी असल्याने सायंकाळी मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. प्रेमीयुगलांना जोडीदारासोबत भविष्याबाबत निर्णय घेण्याची क्षमता लाभेल. शिवाय प्रेम आणि आदर वाढीस लागेल.
त्रिपुष्कर योग सिंह राशीसाठीसुद्धा फलदायी ठरणार आहे. विशेष म्हणजे आज सिंह राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची कृपादृष्टी असणार आहे. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. उद्योग-व्यापारात वाढ होईल. नवा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्यांना आज दिवस शुभ आहे. आरोग्याबाबत तक्रारी सुरु असतील तर त्यापासून आज आराम मिळेल. जुनी दुखणी दूर होऊन नवा उत्साह निर्माण होईल. उत्पन्नात पूर्वीपेक्षा अधिक वाढ होईल. एखादी संपत्ती खरेदी करण्याच्या दृष्टीने हालचाल कराल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
आजचा त्रिपुष्कर योग तूळ राशीसाठी अत्यंत शुभ असणार आहे. आज तुम्हाला सकाळी सकाळी एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे दिवसभर उत्साह आणि आनंद वाटेल. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. हातात घेतलेली कामे विनाअडथळा पूर्ण होतील. नोकरदार वर्गाला सुट्टीचा पूर्ण आनंद घेता येईल. कुटुंबासोबत मनोरंजनात्मक गोष्टी करण्यावर भर द्याल. व्यावसायिकांना मोठ्या डील्स हाती लागतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून घर, वाहन किंवा एखादी संपत्ती घेण्याचा विचार करत असणाऱ्यांची इच्छा आज पूर्ण होईल. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येईल. मुलांसोबत गप्पागोष्टी रंगतील. त्यामुळे मनाला समाधान लाभेल.
संबंधित बातम्या