मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  grah milan : त्रिग्रही योग देणार शुभ लाभ! 'या' ३ राशींसाठी असणार सुवर्णकाळ

grah milan : त्रिग्रही योग देणार शुभ लाभ! 'या' ३ राशींसाठी असणार सुवर्णकाळ

HT Marathi Desk HT Marathi
Jun 15, 2024 12:13 PM IST

Trigrahi Yog : ज्योतिष अभ्यासानुसार आज मिथुन राशीत सूर्य, बुध आणि शुक्र या तीन ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग निर्माण होत आहे.

त्रिग्रही योग देणार शुभ लाभ! 'या' ३ राशींसाठी असणार सुवर्णकाळ
त्रिग्रही योग देणार शुभ लाभ! 'या' ३ राशींसाठी असणार सुवर्णकाळ

Trigrahi Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, राशीभविष्यात ग्रह-नक्षत्र महत्वाची भूमिका बजावतात. ग्रहांचे राशीपरिवर्तन म्हणजेच ग्रहांचे संक्रमण अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करत असतात. हे योग प्रत्येक राशीला चांगले आणि वाईट परिणाम देतात. ज्योतिष अभ्यासानुसार आज मिथुन राशीत सूर्य, बुध आणि शुक्र या तीन ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग निर्माण होत आहे. हा त्रिग्रही योग राशीचक्रातील चार राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि फलदायी मानला जात आहे. त्रिग्रही योगात या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक लाभ मिळणार आहेत. त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत?ते आपण जाणून घेऊया.

त्रिग्रही योग म्हणजे काय?

ग्रह-नक्षत्रांच्या राशी बदलातून आणि हालचालींतून विविध शुभ अशुभ योग घटित होत असतात. तसेच विविध ग्रह एकत्र आल्याने युतीतून अनेक लाभदायक योगसुद्धा जुळून येतात. त्यामुळेच ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतींना विशेष महत्व आहे. शास्त्रामध्ये त्रिग्रही योगाला प्रचंड महत्व आहे. कारण हा योग अत्यंत शुभ असल्याचे मानले जाते. एखाद्या राशीत तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योगाची निर्मिती होते. हा योग अनेक राशींसाठी लाभदायक ठरतो.

वृषभ

राशीचक्रातील दुसऱ्या क्रमांकाची राशी असणाऱ्या वृषभ राशीला या त्रिग्रही योगाचा विशेष लाभ मिळणार आहे. याकाळात वृषभ राशीच्या लोकांना मालमत्तेशी संबंधित विविध आर्थिक लाभ मिळू शकतात. अनेक दिवसांपासून अडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. भूतकाळात केलेल्या गुंतवणूकीचा आता फायदा होईल. तसेच सरकारी नोकरीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळ मानला जात आहे. घरातील अडचणी दूर होऊन सुखसमृद्धी वाढेल. मनाप्रमाणे कामे होत असल्याने आत्मविश्वास वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठांची मर्जी राखल्याने बढती किंवा पगारवाढसारखे लाभ दिसून येतील. एकंदरीत हा योग तुमचे नशीब पालटणारा ठरेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग प्रचंड आनंद आणि फायदा देणारा ठरेल. या काळात सामाजिक कार्यात सहभागी व्हाल त्यातून तुमचा मानसन्मान वाढेल. तुमच्या नेतृत्वाची गुणवत्ता सुधारुन लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. उद्योग-व्यवसायात तुम्हाला आर्थिक फायदा होईल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनावश्यक खर्च कमी केल्यामुळे भविष्यासाठी पैशांची ,मोठी बचत होईल. तसेच मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आर्थिक स्थिती सुधारल्याने घरातील वातावरण आनंदी असेल. महत्वाच्या कामात तुम्हाला कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल. त्यातून तुमचे नातेसंबंध आणखी दृढ होतील.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाचा हा काळ सुवर्णकाळ मानला जात आहे. याकाळात, तुम्हाला मनासारखी आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते. तसेच तुम्हाला तुमच्या आवडीच्या ठिकाणी बदलीही मिळू शकते. याशिवाय अनपेक्षित मार्गाने धनलाभ होऊन तुमच्या संपत्तीत वाढ होईल. जे लोक बेरोजगार आहेत किंवा अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरीची ऑफर मिळू शकते. मात्र कोणत्याही गोष्टींमध्ये निष्काळजीपणा करणे टाळा. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. याकाळात तुमच्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढेल.

WhatsApp channel