ज्योतिषशास्त्रानुसार, मानवी आयुष्यात ग्रह-नक्षत्र महत्वाची भूमिका बजावतात. ग्रहांचे राशीपरिवर्तन म्हणजेच ग्रहांचे संक्रमण अनेक शुभ आणि अशुभ योग तयार करत असतात. हे योग बाराही राशींना चांगले आणि वाईट परिणाम देतात. ज्योतिष अभ्यासानुसार सिंह राशीत सूर्य, बुध आणि शुक्र या तीन ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग निर्माण होत आहे. हा त्रिग्रही योग राशीचक्रातील तीन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि फलदायी मानला जात आहे. त्रिग्रही योगात या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक लाभ मिळणार आहेत. त्या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत?ते आपण जाणून घेऊया.
ग्रहांच्या राशी-नक्षत्र बदलातून आणि हालचालींतून विविध शुभ अशुभ योग घटित होत असतात. तसेच विविध ग्रह एकत्र आल्याने युतीतून अनेक लाभदायक योगसुद्धा जुळून येतात. त्यामुळेच ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतींना विशेष महत्व आहे. शास्त्रामध्ये त्रिग्रही योगाला प्रचंड महत्व आहे. कारण हा योग अत्यंत शुभ असल्याचे मानले जाते. एखाद्या राशीत तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योगाची निर्मिती होते. हा योग अनेक राशींसाठी लाभदायक ठरतो.
त्रिग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या योगात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. हातात घेतलेल्या प्रत्येक कामाला यश मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व आणखीन बहरून येईल. लोकांना तुमच्या कामाचे कौतुक वाटेल. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना हा काळ उत्तम आहे. तुमचे नाते लग्नापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी व्हाल. अचानक धनलाभ होईल. आर्थिक चणचण दूर होऊन घरात सुखसमृद्धी नांदेल.
कर्क राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा लाभ मिळणार आहे. याकाळात तुमच्या वाणीत प्रचंड सकारात्मक बदल होईल. लोक तुमच्या बोलण्यावर प्रभावित होतील. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनेल. ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात पाहायला मिळेल. या योगात तुम्हाला विविध मार्गाने धनलाभ होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम होईल. उद्योजक-व्यापाऱ्यांना याकाळात चांगला आर्थिक नफा मिळेल. व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. यातून एखादी मोठी जबाबदारी पदरात पडू शकते.
धनु राशीच्या लोकांनासुद्धा त्रिग्रही योग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. याकाळात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेटी होऊन ओळखी वाढतील. या लोकांच्या संपर्कात आल्याने समाजात तुमचाही दबदबा वाढेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. कामानिमित्त प्रवास घडून येईल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. तुमच्यामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होईल.
संबंधित बातम्या