मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : आज होळीच्या दिवशी या ६ राशींना अच्छे दिन; गृहसौख्य लाभेल, आर्थिक लाभ होईल

Today lucky zodiac signs : आज होळीच्या दिवशी या ६ राशींना अच्छे दिन; गृहसौख्य लाभेल, आर्थिक लाभ होईल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 24, 2024 09:25 AM IST

Lucky Rashi Today 24 march 2024: आज रविवार (२४ मार्च) हा दिवस मेष, वृषभ, मिथून, वृश्चिक, मकर आणि कुंभ या ६ राशींना आर्थिक यशाचा ठरेल. या राशींसाठी रविवारचा दिवस आनंदाचा असणार आहे.

Today lucky zodiac signs : आज होळीच्या दिवशी या ६ राशींना अच्छे दिन; गृहसौख्य लाभेल, आर्थिक लाभ होईल
Today lucky zodiac signs : आज होळीच्या दिवशी या ६ राशींना अच्छे दिन; गृहसौख्य लाभेल, आर्थिक लाभ होईल

Lucky Rashi Today 17 march 2024: आज रविवार (२४ मार्च) होळीचा हा दिवस मेष, वृषभ, मिथून, वृश्चिक, मकर आणि कुंभ या ६ राशींना आर्थिक यशाचा ठरेल. या राशींसाठी रविवारचा दिवस आनंदाचा असणार आहे.

मेषः आजचं चंद्रभ्रमण पाहता शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. 

लोकप्रियता समाज कारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. 

वृषभः आज शुक्राशी होणारा योग पाहता गोचर चंद्रभ्रमणात धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेश गमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्म विश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. 

मन समाधानी राहिल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील.

मिथुनः आजच्या चंद्रगोचरात कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. 

एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

वृश्चिकः आज चंद्राशी होणारा शुभ ग्रहांचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. 

मकरः आज चंद्रगोचरात जुनी येणी वसूल होतील. कष्ट करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे.

कुंभः आज गंड योगातील चंद्रभ्रमणात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल.  एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहिल. 

 

WhatsApp channel

विभाग