मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : आज या ५ राशी ठरतील नशीबवान; गृहसौख्य लाभेल, मान-सन्मान मिळेल, उत्पन्न वाढेल

Today lucky zodiac signs : आज या ५ राशी ठरतील नशीबवान; गृहसौख्य लाभेल, मान-सन्मान मिळेल, उत्पन्न वाढेल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 17, 2024 10:09 AM IST

Lucky Rashi Today 17 march 2024: आज रविवार (१७ मार्च) हा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह आणि धनु या ५ राशींना आर्थिक यशाचा ठरेल. या राशींसाठी रविवारचा दिवस आनंदाचा असणार आहे.

todays lucky zodiac signs 17 march 2024
todays lucky zodiac signs 17 march 2024

todays lucky zodiac signs 17 march 2024 : आज रविवार (१७ मार्च) दुर्गाष्टमीचा चंद्र बुधाच्या राशीतुन आणि मंगळाच्या नक्षत्रातुन संक्रमण करत आहे. आयुष्मान योग असुन मंगळ,शुक्र आणि शनिशी संयोग करीत आहे. अशा स्थितीत, ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योगाचा लाभ होईल, या नशीबवान राशी कोणत्या आहेत? वाचा.

मेषः आज घरातील अनेक अडचणी सुटतील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयाप्रत पोचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. 

व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहिल.  घरगुती वातावरण चांगले राहिल. 

शुभ रंगं: केसरी शुभ दिशाः दक्षिण.

शुभ अंकः ०७, ०९.

मिथुनः आज आयुष्मान योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल.  

आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.

शुभ रंगः पोपटी शुभ दिशाः उत्तर.

शुभ अंकः ०२, ०९.

कर्कः आज चंद्राशी होणारा ग्रहांचा संयोग पाहता धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. 

शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. घरासंबंधी समस्या दूर होतील. व्यापारात साथिदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. 

शुभ रंगः पांढरा शुभ दिशाः वायव्य.

शुभ अंकः ०४, ०७.

सिंह: आजच्या चंद्रगोचरात खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. 

ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोश पूर्वक कामात रस घ्याल.

शुभ रंगः लालसर शुभ दिशाः पूर्व.

शुभ अंकः ०१, ०९.

धनु: आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. दूरच्या प्रवासाचे योग येतील. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.

शुभ रंगः पिवळा शुभ दिशाः ईशान्य.

शुभ अंकः ०३, ०७.

विभाग