मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : या ५ राशींसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा; अर्थिक लाभ होईल, उत्पन्न वाढेल

Today lucky zodiac signs : या ५ राशींसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा; अर्थिक लाभ होईल, उत्पन्न वाढेल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 18, 2024 12:41 PM IST

Lucky Rashi Today 18 march 2024 : आज सोमवार (१८ मार्च) हा दिवस मेष, मिथुन, कर्क, वृश्चिक आणि मकर या ५ राशींना आर्थिक यशाचा ठरेल. या राशींसाठी सोमवारचा दिवस आनंदाचा असणार आहे.

Lucky Rashi Today 18 march 2024 : या ५ राशींसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा; अर्थिक लाभ होईल, उत्पन्न वाढेल
Lucky Rashi Today 18 march 2024 : या ५ राशींसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा; अर्थिक लाभ होईल, उत्पन्न वाढेल

todays lucky zodiac signs 18 march 2024  : आज सोमवार (१८ मार्च २०२४) चंद्रमा राहुुच्या नक्षत्रातुन भ्रमण करतोय. गुरू आणि हर्शलचा चंद्रासोबत योग घटीत होत आहे. दिनमानावर चंद्राचा प्रभाव राहील. या सर्वांमुळे आज काही राशींसाठी अगदी शुभ दिवस आहे. त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

मेषः आजचं चंद्रभ्रमण आपणास भाग्यकारक अनुभव देणारा आहे. तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. कलाकरांना अनेक संधी दार ठोठावतील. परदेशगमनाचे योग संभवतात. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल.

शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण.

शुभअंकः ०७, ०९.

मिथुनः आज मनासारखी खरेदी कराल. त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. सर्वच स्तरातील नाते संबंधात स्नेह निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदारा बद्दल प्रेम भावना वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील.

शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.

शुभअंकः ०३, ०६.

कर्कः आज पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. त्याबरोबरच उत्तम बोलण्याची साथ जर व्यवहारात दिलीत तर फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील.

मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. फक्त भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कायदेशीर बाबींची प्रक्रीया असेल तर निकाल आपल्या बाजुने लागेल. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. 

शुभरंग: गुलाबी शुभदिशा: वायव्य.

शुभअंकः ०३, ०४.

वृश्चिकः आज चंद्रबल अनुकूल असल्याने नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीमुळे आर्थिक लाभ चांगले होतील. पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल. करियरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल.  नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे.

 मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहिल. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्ज प्रकरण मंजुर होतील. 

शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण.

शुभअंकः ०७, ०९.

मकरः आज चंद्र बलवान असल्याने आपणास अत्यंत शुभ दिवस असणार आहे. मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त रहाण्याचा योग आहे. नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. मानमरातब अधिकाराचे योग संभवतात. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. 

आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.

शुभअंकः ०१, ०८.

 

WhatsApp channel

विभाग