मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi : वृषभ राशीच्या लोकांना आज शेअर मार्केटमध्ये होणार फायदा! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi : वृषभ राशीच्या लोकांना आज शेअर मार्केटमध्ये होणार फायदा! वाचा चारही राशींचे भविष्य

HT Marathi Desk HT Marathi
Jun 04, 2024 09:19 AM IST

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : आज उदित बुध अस्त होणार आहे. त्यामुळे दिवसभर शोभन योग, अतिगंड योग आणि गरजकरण असणार आहे.

Lucky Zodiac Signs : वृषभ राशीच्या लोकांना आज शेअर मार्केटमध्ये होणार फायदा! वाचा चारही राशींचे भविष्य
Lucky Zodiac Signs : वृषभ राशीच्या लोकांना आज शेअर मार्केटमध्ये होणार फायदा! वाचा चारही राशींचे भविष्य

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya 4 June 2024 : जोतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी स्थान बदलाने विविध योग घटित होत असतात. तसेच आज उदित बुध अस्त होणार आहे. त्यामुळे दिवसभर शोभन योग, अतिगंड योग आणि गरजकरण असणार आहे. या योगांमध्ये आजचा दिवशी मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा जाणार हे जाणून घेऊया.

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. या लोकांनी काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगावी. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा बेपर्वाईपणा राहील. प्रतिकूल परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देवाणघेवाणीच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची-भागीदाराची मदत घ्यावी लागेल. तुमच्या स्वभावात चंचलता निर्माण होईल.

शुभरंग: नारंगी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०१,०७.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. तुमच्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकूल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल असा प्रतिसाद मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.

शुभरंग: गुलाबी शुभदिशा: आग्नेय.शुभअंकः ०२, ०४.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस काहीसा त्रासदायक असणार आहे. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनाची गोडी वाढेल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल.

शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.शुभअंकः ०२, ०६.

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा तुम्ही जरूर करून घेणार आहात. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. मनासारख्या अनुकूल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०२, ०७.

WhatsApp channel
विभाग