मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 24 May 2024 : नवमपंचम योगात कोणत्या राशीसाठी आजचा दिवस असणार खास? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 24 May 2024 : नवमपंचम योगात कोणत्या राशीसाठी आजचा दिवस असणार खास? वाचा राशीभविष्य

May 24, 2024 11:08 AM IST

Today Horoscope 24 May 2024 : आज चंद्र मंगळच्या राशीतून आणि बुध शनिच्या नक्षत्रातून चंद्रभ्रमण होणार आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलांचा १२ राशींवर कसा प्रभाव राहील? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य २४ मे २०२४
राशीभविष्य २४ मे २०२४

आज शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी नारद जयंती साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे अहोरात्र चंद्र मंगळाच्या राशीतून आणि बुध शनिच्या नक्षत्रातून चंद्रभ्रमण होणार आहे. सोबतच आज नवपंचम योग घडून येत आहे. यामध्ये आजचा दिवस आपल्यासाठी कसा जाणार,हे राशीभिविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेष: 

मेष राशीचे लोक आज चंद्र राहु नवमपंचम योगात रोजगारात कोणत्याही कामाचे नियोजन करण्यात कमी पडण्याची शक्यता आहे. ज्ञानाचा उपयोग विधायक कामासाठी करणे आवश्यक आहे. मित्रपरिवारावर जास्त विश्वास टाकणे योग्य ठरणार नाही. आर्थिक चणचण भासेल.

वृषभ: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने व्यापारात व्यवहाराची सांगड योग्यरितीने घातली नाही तर नुकसान होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. चांगले आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल.

मिथुन: 

आज तैतील करणात आपणास मानसिक त्रास देणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही तडजोडी कराव्या लागतील. घरात आणि घराबाहेर मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र आर्थिक लाभ मिळाल्यामुळे समाधान वाटेल.

कर्क: 

आज नेपच्युन-चंद्र नवमपंचम योगात बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. व्यवसायात लहरीपणा ठेऊन चालणार नाही. कठोर बोलण्याने लोकांची मने दुखावली जातील. आरोग्याच्यादृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. त्यामुळे पथ्यपाणी सांभाळणे हिताचे ठरेल.

सिंह: 

आज राहूशी होणारा चंद्रयोग पाहता धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल. आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कष्ट करायची तयारी ठेवाल.

कन्या: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील.

तूळ: 

आज चंद्र भ्रमणातून शुभ फलदायी घटना घडणार आहेत. सरकारी नोकरीतल्या लोकांना मानमरातब प्रमोशन मिळण्याचे योग येतील. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल. जुनी येणी वसूल होतील.

वृश्चिक: 

आज चंद्र नेपच्युन नवमपंचम योगाची स्थिती लक्षात घेता कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. एखाद्या विषयात तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धाडस आणि कामाचा उरक चांगला राहील. व्यवसायात कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परदेशासंबंधी व्यवहार असणाऱ्यांना दिवस फायदेशीर ठरेल.

धनु: 

आज चंद्र नेपच्युनशी संयोग करीत असल्याने आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय नोकरी या संदर्भातील कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी मोठी खरेदी करण्याचा मूड राहील.

मकरः 

आज चंद्रबल उत्तम लाभल्याने तुमची बौद्धिक क्षमता सिद्ध कराल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील.

कुंभः 

आजच्या चंद्रभ्रमणात कोणत्याही परिस्थितीचा भेद करून पुढे येण्याच्या तुमच्या इच्छेला पूरक वातावरण लाभेल. तरीसुद्धा अनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील. प्रत्यक्षात न उतरणारी स्वप्ने रंगवल्यामुळे अपेक्षा भंगाला तोंड द्यावे लागेल.

मीन: 

आजचे चंद्रबल विचारात घेता कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. खर्चिक आणि उधळ्या स्वभावाला वेळीच आळा घालावा लागेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत प्रतिष्ठेच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल.

WhatsApp channel