मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 23 May 2024 : शिव योगात आज गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा जाणार? वाचा राशीभविष्य

Today Horoscope 23 May 2024 : शिव योगात आज गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा जाणार? वाचा राशीभविष्य

May 23, 2024 08:35 AM IST

Today Horoscope 23 May 2024 : आज रवि- गुरू शुक्राशी प्रतियोग करीत आहेत. आजच्या दिवसावर गुरुचा विशेष प्रभाव राहील. ग्रह-नक्षत्राच्या बदलांचा १२ राशींवर कसा प्रभाव राहील? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य २३ मे २०२४
राशीभविष्य २३ मे २०२४

आज गुरुवार २३ मे २०२४ रोजी कूर्म जयंती साजरी केली जात आहे. तसेच बुद्धपौर्णिमेचा चंद्र वृश्चिक राशीतून आणि अनुराधा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. दुसरीकडे रवि- गुरू शुक्राशी प्रतियोग करीत आहेत. आजच्या दिवसावर गुरुचा विशेष प्रभाव राहील. आज शिव योग आणि बालव करणसुद्धा आहे. अशात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मेषः 

आज चंद्राशी होणारा इतर ग्रहांचा योग पाहता प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. तुमच्या अंगी असलेल्या धडाडी वृत्तीचा मात्र फायदा होईल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील.

वृषभः 

आज चंद्र शुक्राशी संयोग करत आहे. त्यामुळे तुमचा थोडा तापट स्वभाव कामात अडचण ठरु शकतो. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. अती संवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा विनाकारण विचार करीत रहाल. आज आत्मविश्वास आणि उत्साह कमी राहील.

मिथुनः 

आज अनुराधा नक्षत्रातील चंद्रभ्रमण मिथुन राशीला विशेष लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासमोर शत्रूंचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यात पुढे रहाल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील.

कर्कः 

आज रवि-चंद्र प्रतियोगात तुमची वृत्ती आनंदी असली तरी कोणी तुमच्याशी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही काम एका हेलपाट्यात होणार नाही. त्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल.

सिंहः 

आज चंद्रबल चांगला लाभल्याने कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यापार व्यवसायात एखादे काम मिळण्याच्या मागे असाल तर उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील.

कन्याः 

आज ग्रहयोग अनुकूल आहेत. नोकरी व्यापारात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी राखल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. रहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल.

तूळ: 

आज चंद्रभ्रमण शुभ स्थानातून होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल.

वृश्चिकः 

आज ग्रहबल शुभ राहिल्याने ऐषारामी आयुष्य जगावे असे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाहेच्छूना आपला साथीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल.

धनुः 

आज चंद्रबल अनुकूल राहील. व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक आयुष्यात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी मनःशांती मिळेल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील.

मकरः 

आज चंद्र आणि गुरू यांचा योग होत असून चंद्रावर शनिची पुर्ण दृष्टी असणार आहे. खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लाबंच्या प्रवासाचे योग येतील.

कुंभः 

आज रवि चंद्र योगात तुमच्या अत्यंत सौम्य व शांत स्वभावाचा गैरफायदा कोणी घेत नाही ना याकडे लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणावर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत मतभेद झाल्याने दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल.

मीनः 

आज शिव योगात प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत.

WhatsApp channel