Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya: आज शनिवार, १८ मे २०२४ रोजी ग्रह संक्रमण आणि पंचाग गणती पाहता आजचा दिवस काही राशींसाठी खास ठरणार आहे. चंद्र कन्या राशीतून आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. आज हर्षण योग व वणिज करण आहे. या सर्व योगांमध्ये मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल हे पाहूया.
मेष राशीच्या लोकांसाठी आज सकारात्मकेचे परिणाम दिसतील. तुमच्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्र मैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. अति आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल. आज चंद्र संक्रमण शुभ स्थानातून होत आहे. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शीपणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमजाच्या गोष्टी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. त्यातूनही फायदाच होईल.
शुभ रंग: नारंगी
शुभ दिशा: दक्षिण
शुभ अंकः ०१, ०९.
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातून धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. चंद्र रविच्या नक्षत्रातून गोचर करणार असून उत्कृष्ट बुद्धीमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मुडी स्वभाव यामुळे तुम्ही जरा जगावेगळे भासाल. शिवाय काळाच्या पुढे विचार करण्याची वृत्ती राहील. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल रहाणार आहे.
शुभ रंगः भगवा
शुभ दिशाः आग्नेय
शुभ अंकः ०३, ०६.
आज मिथुन राशीच्या लोकांच्या स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. इतरांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्तीमुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनांवर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता वाटू शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. तसेच, आज चंद्राचा मंगळशी होणारा संयोग पाहता व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. कामात स्पर्धेला तोंड द्यावे लागले तरी आत्मविश्वासाने पुढे जात राहा. मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागुन जाल.
शुभ रंगः पोपटी
शुभ दिशाः उत्तर
शुभ अंकः ०२, ०६.
कर्क राशीच्या लोकांची प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या कार्यात कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घेतल्यास फलदायी ठरेल. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसोबत चांगले संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल.
शुभ रंगः पांढरा
शुभ दिशाः वायव्य
शुभ अंकः ०२, ०७.