Sinh Kanya Tula Vrishchik Rashi Bhavishya: जोतिषशास्त्रानुसार आज, चंद्रभ्रमण दिवसभर कन्या राशीच्या फाल्गुनी नक्षत्रातून होणार आहे. त्यावर आज गुरुची पंचम दृष्टी राहणार आहे. या सर्व ग्रह-नक्षत्र बदलांमुळे राशीशास्त्रातील राशींवरसुद्धा शुभ-अशुभ प्रभाव पडणार आहे. आज या सर्व योगांचा सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीवर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
सिंह राशीच्या लोकांसाठी आज व्यापारात चांगले बदल अतिशय फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. चंद्र-हर्षण योगात असताना नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. नवीन संधी तुमच्या पदरात पडणार आहेत. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. ज्या कार्याचा निश्चय कराल ती गोष्ट पारपडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात.
शुभ रंगः लाल
शुभ दिशाः पूर्व
शुभ अंकः ०५, ०९.
विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ मिळेल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल असा प्रतिसाद मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल. तसेच आज मंगळाचा चंद्राशी होणारा संयोग पाहता धार्मिक गोष्टी करण्यासाठी बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. करत असलेल्या कामाचे चांगले लाभ तुम्हाला होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. तुमच्या प्रयत्नांना यश लाभेल.
शुभ रंग: हिरवा
शुभ दिशा: उत्तर
शुभ अंकः ०२, ०७.
तूळ राशीच्या लोकांची वाचनात गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न कराल. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक आयुष्यात थोडी तडजोड करावी लागेल. अंगात थोडा आळस शिरेल त्यामुळे कामे उरकण्यात थोडा विलंब होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून होईल. घरातील दबावाचे वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्या मुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात.
शुभ रंग: गुलाबी
शुभ दिशा: आग्नेय
शुभ अंकः ०२, ०७.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्यादृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. आज चंद्रभ्रमण आणि ग्रहयोग अनुकुल असल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा उमठवण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. तुमच्या बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा तुम्ही जरूर करून घेणार आहात. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील.
शुभ रंग: भगवा
शुभ दिशा: दक्षिण
शुभ अंकः ०४, ०७.
संबंधित बातम्या