मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : प्रीती योगात वृषभ राशीच्या लोकांना भावंडांकडून होणार धनलाभ!

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya : प्रीती योगात वृषभ राशीच्या लोकांना भावंडांकडून होणार धनलाभ!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 01, 2024 07:57 AM IST

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya :चंद्र आज मीन राशीतून आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. वाचा चार राशींचे भविष्य…

Mesh Vrishabh Mithun Kark
Mesh Vrishabh Mithun Kark

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya: जोतिषशास्त्रानुसार आज ज्येष्ठ महिन्याची नवमी आणि दशमी तिथी आहे. त्याचबरोबर चंद्र आज मीन राशीतून आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. या संक्रमणामुळे प्रीती योग व वणिज करण यांची निर्मिती होत आहे. दरम्यान या योगांत आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी कसा जाणार ते पाहूया.

 

मेष

आज नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. काहीसा अडचणीत आणणारा दिवस आहे. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उद्भवेल. कोणतेही मोठे धाडसी निर्णय आज घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींसोबत व्यवहार करताना जपून करा. जोडीदारासोबत  वैचारिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार आहे. आपआपसातील वाद सामंजस्याने मिटवा. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे.आजच्या दिवशी दूरचा प्रवास करणे टाळा. आहारावर नियंत्रण ठेवा.

शुभ रंगः नारंगी 

शुभ दिशाः दक्षिण

शुभ अंकः ०२, ०७.

Horoscope June 2024 : ग्रह-नक्षत्राच्या प्रभावात जून महिना तुम्हाला कसा जाईल? वाचा मासिक राशीभविष्य

वृषभ

वृषभ राशीसाठी जून महिन्याचा पहिला दिवस उत्तम असणार आहे. रोजगारात तुमची प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे. आपले कर्तुत्व सिद्ध कराल. पराक्रम आणि साहसी वृत्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन संधी सोडू नका. नोकरीत एका नव्या कंपनीशी तुमचा संबंध जुळण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत चांगले संकेत मिळतील. व्यापारात नवीन योजना आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहेत.

शुभ रंगः भगवा 

शुभ दिशाः पश्चिम

शुभ अंकः ०२, ०७.

Numerology Prediction : अत्यंत गूढ आणि रहस्यमय स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक! पाहा काय सांगते अंकभविष्य

मिथुन

घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्या मुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. आपल्या व्यसनांना आवर घाला. शारिरिक व्याधीचा कामावर विपरित परिणाम होईल. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यास कसरत करावी लागेल. व्यापारात प्रतिस्पर्ध्यासोबत आव्हान निर्माण होईल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. मित्रमैत्रिणीं सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावे. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल. 

शुभ रंगः पोपटी 

शुभ दिशाः उत्तर 

शुभ अंकः ०४, ०८.

 

कर्क

आज कर्क राशीच्या प्रेमीयुगलांसाठी दिवस अनुकूल आहे. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन नाते आणखी दृढ होईल. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वतःच करा. मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मनोरंजनाकडे कल वाढेल. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष दया. नातेवाईक मित्रमंडळी यांच्याशी सहवास वाढवण्यासाठी योग उत्तम आहे. अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा वाढेल. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळेल. धार्मिक व्यक्तिंच्या सहवास लाभेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल.

शुभ रंगः पांढरा 

शुभ दिशाः वायव्य

शुभ अंकः ०६, ०९.

WhatsApp channel