मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Lucky Zodiac Signs 25 May 2023 : परदेश प्रवास होतील, जुनी येणी वसूल होतील

Today Lucky Zodiac Signs 25 May 2023 : परदेश प्रवास होतील, जुनी येणी वसूल होतील

May 25, 2023 06:38 AM IST

Lucky Zodiacs Today : आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आज कोणत्या राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम ग्रहमान घेऊन आला आहे हे पाहूया.

आजच्या नशीबवान राशी
आजच्या नशीबवान राशी (HT)

मेष रास 

राजकीय, कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाहाबद्दल इच्छित असणाऱ्यांचे विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. आज नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे

शुभरंग: केसरी

सिंह रास 

पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. गृहस्थी सौख्य लाभेल. एकंदरीत आजचं दिनमान उत्तम आहे. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल.

शुभरंग: लाल

वृश्चिक रास 

सरकारी योजना अमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील.जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. प्रकृती स्थिर राहील. व्यावसायिक प्रवास होईल. आकस्मिक लाभ होतील. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे.आज अत्यंत शुभ दिवस आहे.

 शुभरंग: तांबूस

मीन रास 

व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल.ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. नवीन घर वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. मनात उर्जा आणि सकारात्मकता वाढेल. नोकरदार वर्गाकरीता आनंदाची बातमी मिळेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. संततीकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक सहकार्य लाभेल. आज दिवस उन्नतीकारक आहे.

 शुभरंग: पांढरा

WhatsApp channel
विभाग