मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Lucky Zodiac Signs 24 May 2023 : सरकारी नोकरीतल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदी असेल
आजच्या नशीबवान राशी
आजच्या नशीबवान राशी (HT)

Today Lucky Zodiac Signs 24 May 2023 : सरकारी नोकरीतल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदी असेल

24 May 2023, 6:35 ISTDilip Ramchandra Vaze

Lucky Zodiacs Today : दररोज काही राशी अशा असतात, ज्यांच्याबाबतीत काही गोष्टी सकारात्मक घडत असतात. तो दिवस त्या राशींसाठी अत्यंत शुभ किंवा फलदायी असतो. अशाच काही नशीबवान राशी कोणत्या आहेत, याचा आपण आढावा घेऊया.

कर्क रास

ट्रेंडिंग न्यूज

क्रिएटिव्ह मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. चंद्रबल उत्तम लाभलेले आहे. संधीचं सोनं करा. काही नवीन कल्पना अमलात आणा. विचलीत होऊ नका. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. आज नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.वरिष्ठांची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. नोकरदारांना बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. 

शुभरंग: पांढरा

कन्या रास 

लेखन कला कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. व्यवाहारिक समस्या दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. शासकीय सेवेतील नोकरदारांसाठी सफलतादायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. गृहसौख्य लाभेल. पत्नीची साथ मिळेल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. आज स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभयोग आहे. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ होईल.कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल.

शुभरंग: पोपटी

वृश्चिक रास 

अध्यात्माची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक शिक्षण क्षेत्रात कर्तुत्वाची संथी मिळेल. साधुसंत व्यक्तींचा सहवास लाभेल.आध्यात्मिक कार्य घडेल. दूरवरच्या प्रवासातून लाभ होतील. कुटुंबातील व्यक्तींकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. शासकीय कामात शुभ दिवस आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील. आज भाग्याची साथ लाभणार आहे. नोकरीत कामात यश मिळेल. मनोबल वाढेल.  रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. 

शुभरंग: केसरी

मकर रास 

आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्साहाचा आहे.आज समाजात मानसन्मान मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात स्नेहपूर्वक वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.  प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. नोकरीत नवीन योजना- प्रकल्प कार्यान्वित होतील. दिनमान उत्साहवर्धक राहील.

शुभरंगः जांभळा

विभाग