मराठी बातम्या  /  Astrology  /  Today Lucky Zodiac Signs 23 May 2023

Today Lucky Zodiac Signs 23 May 2023 : महिला वर्गाला आज अत्यंत शुभ दिनमान आहे

आजच्या नशीबवान राशी
आजच्या नशीबवान राशी (HT)
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
May 23, 2023 06:30 AM IST

Lucky Zodiacs Today : राशीनुसार आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याची माहिती मिळते. प्रत्येक राशीची आपली अशी काही वैशिष्ट्य असतात. त्या वैशिष्ट्यांनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो.

कर्क रास 

ट्रेंडिंग न्यूज

व्यापार व्यवसाय बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम दिनमान आहे. आखलेल्या योजना पूर्ण होणार आहेत.शासकीय योजना अमलात येतील. काही नवनवीन कल्पना सूचतील. पत्नीशी चांगले संबंध राहतील. शुभवार्ता ऐकायला मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल. लाभदायक दिनमान असेल.फायदेशीर दिवस राहणार आहे. कुंटुंबातील अडचणी दूर होतील. आपणासाठी मान-सन्मान प्रतिभा वाढविणारा दिवस आहे. मनोबल आत्मविश्वास वाढेल. साहसी निर्णय घ्याल. नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल.

शुभरंग: सफेद

सिंह रास 

कामासाठी दुरचे प्रवास घडतील. परदेशभ्रमण घडेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. दिनमान उत्तम राहील. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. आज आर्थिक बाबतीत चांगले संकेत मिळतील. संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील.  

शुभरंग: लाल

तूळ रास 

जबाबदारीने कामे केल्यास भाग्याची साथ लाभेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. नवीन प्रकल्प कामे मिळतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. कौटुंबिक सौख्यही उत्तम लाभेल. प्रवास सुखकर होईल. आज लाभदायक दिनमान आहे. आर्थिक लाभ होईल. नोकरीत काम यशस्वी होतील. व्यापारात नफ्यात वाढ होणार आहे. 

शुभरंग: पांढरा

मकर रास 

पत्नीकडून सहकार्य लाभेल. रोजगारात व्यापार व्यवसायानिमित्त दुरवरचे प्रवास होतील. प्रवासातून लाभ होईल. संशोधनात्मक कार्य घडतील. मानसन्मान मिळेल.केलेल्या कामाचा योग्य मोबदला पदरी पडेल. मन प्रसन्न प्रफुल्लीत राहिल. उर्जावान दिनमान आहे. नोकरीत महत्वाची कामे मार्गी लागतील. व्यापारात नवीन योजना आखाल. उत्तम अर्थप्राप्ती होईल. सामाजिक राजकीय कार्यातून लाभ होईल. सफलतापूर्वक दिनमान आहे. आज भाग्याची साथ लाभणार आहे. दिनमान आनंददायी आहे.

शुभरंग: निळा

विभाग